कात्रज बोगद्या ऐवजी नवले पूलाकडे वळवली बस   

प्रवाशांकडून घेतले आगाऊ पैसे ; एसटी वाहकाचा अजब कारभार

पुणे : राजापूर ते स्वारगेट एसटी बस कात्रज बोगद्यातून न येता सरळ महामार्गावरून नवले पूलाकडून वळल्याने वाहकांनी प्रवशांकडून जबरदस्तीने आगाऊ पंधरा रूपये घेतल्याचा प्रकार घडला. मात्र स्वारगेट एसटी प्रशासनाने वाहकावर कोणती ही कारवाई केली नसल्याने प्रवाशांनी खंत व्यक्त केली.
 
महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बस वाहकाचा अजब कारभार समोर आला आहे. राजापूर ते स्वारगेट एसटी पुण्याकडे येत असताना कात्रज मार्गी  न येत  सरळ महामार्गावरून नवले पूला जवळून वळाली आणि पुन्हा कात्रज उद्यान जवळून स्वारगेट कडे आली. मात्र बस वळल्याने पंधरा रूपयेचे तिकीट  पुन्हा जबरदस्तीने घेतले.यामुळे सर्व प्रवाशांनी  याला विरोध केला.मात्र शासनाचा आदेश असल्याचा उडावा उडवीचे उत्तर देऊन जबरजस्तीने पैसे घेतले.काही प्रवाशांनी आगाऊ पैसे देण्यास नकार दिला. एक प्रवाशी सातारा येथून या गाडीत बसला.  तेव्हा त्याला  वाहकानी १७२ रूपयेचे तिकीट दिले. या नंतर कात्रज पर्यत गाडी आल्यावर याला पंधरा रूपयेच अजून एक तिकीट घ्या अशी जबरदस्ती केली. तेव्हा अगोदरच का सांगितले नाही का? असा प्रश्न त्यांनी वाहकाला केला. तेव्हा त्यांनी उडावा उडवीचे उत्तर दिले. प्रवशांनी संताप व्यक्त करून तुम्ही स्वारगेट डेपोच्या वरिष्ठकडे चला असे सर्व प्रवांशी म्हटले.मात्र काही प्रवाशांना घाई  असल्याने न ती कटकट म्हणून आगाऊ पैसे दिले. मात्र काही प्रवाशांनी याला विरोध केला. हे प्रकरण सरळ स्वारगेट पोलिस चौकीत गेले. या दरम्यान तुम्ही शासनाच्या आदेशाची प्रत बस मध्ये का लावली नाही ? किंवा अगोदरच का प्रवाशांना सांगितले नाही? अशी विचाराणाही पोलिसांनी वाहकाला केली.
 
बस स्थानक जवळ आल्यावर प्रवाशाकडून जबरदस्ती पैसे वसूल करणे चुकीचे आहे. ही बाब एस.टी.महामंडळाच्या कायद्याला धरून नाही. याची सखोल चौकशी करून वाहकाचे निलबंन केले पाहिजे.  तिकीटाला आगाऊ पैसे लागतील याची  सूचना बस मध्ये का लावली नाही. किवा प्रवाशांनाही सांगितले नाही. ही सर्व चुक वाहकाची आहे. याची सर्व चौकशी होणे गरजेचे आहे. लोकांचा पैशावर कोणाचा डोळा आहे.ही बाब जनतेच्या समोर आली पाहिजे.अशी जबरदस्ती वसूलीचा पैशा जातो कुठे ही चौकशी झाली पाहिजे.

संदीप खुडे, प्रवाशी

 

Related Articles